लॉकडाउन

लॉक डाउन : साधारणतः20 मार्च 2020 पासून सुरू झालेला लॉकडाउन आज 20 मे आला तरी संपला नाही. या काळात बरीच लग्ने झाली तर बऱ्याच नववधु-वरांना कायद्याचा प्रसाद पण मिळाला.. तसे आपण सर्वांनीच या काळात आशा लग्नाचे अनेक किस्से ऐकले असतील, पाहिले असतील, अनुभवलेही असतील.. आपला ब्लॉग पण जवळजवळ लॉकडाउनच झाला आहे.. कुणी नवीन नोंदणी केली नाही की चौकशी नाही.. त्यामुळे येणाऱ्या काळात अत्यावश्यक गोष्टींमध्ये लग्नाचा विषय गंभीरतेने घ्यावा लागेल हे नक्की.. आणि त्याच दृष्टीने आपल्यालाही आता काही पारंपरिक पद्धती बदलून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे पाऊले टाकावी लागतील. त्याचाच एक भाग म्हणून भविष्यात (गरज पडल्यास) "ऑनलाइन वधुवर परिचय" ही संकल्पना राबवावी लागेल, आणि त्यासाठी प्रयत्नशील राहू.. जगात कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वांनी घरातच राहणे महत्वाचे आहे तसेच मास्क, हॅन्डवॉश/सॅनिटाईझर वापरणे अत्यावश्यक आहे.. तरी सर्व समाज घटकांनी या गोष्टींचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे. आपला : संजय धानके 9823222670 ता.क. - ज्यांचे विवाह जमले असतील पण मॅट्रिमोनि मध्ये अजून नाव तसेच आहे,...