Posts

प्रत्येकाने वाचावे असे..

Image
  एक प्रश्नही निर्माण होतो: जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती. पद आणि पैशाचा काय उपयोग??? येणारा काळ हा अविवाहितां, चा काळ असेल... एका नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, पुढील सहा वर्षात जगातील सुमारे ४५% महिला अविवाहित राहतील. हा अहवाल १ मे २०२६ रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. हा मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) केलेल्या एका विस्तृत अभ्यासावर आधारित आहे. अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष  १. आजच्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि आपल्या करियरला प्राधान्यच देतात.  २. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाहीत.  ३. त्यांना स्वातंत्र्य आवडते आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ इच्छितात.  ४. त्यांनी लग्न, मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.  ५. हा कल असाच सुरू राहिला, तर पारंपारिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते.  ६. लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांच्या संख्येत वाढ होणे आणि वृद्धत्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण हो...

विनंती

 

अपेक्षा....

Image
 

सौभाग्य अलंकार

Image
 

विवाह एक भीषण परिस्थिती... 🎯

Image
 🎯 विवाह एक भीषण परिस्थिती..😔💗😔     पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. *फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही.* कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळ...

आधुनिक लग्न - एक गंभीर प्रश्न

एका सर्वेक्षणानुसार, भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवर खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या वरची गेलेली आहे.  सनातनमध्ये लग्न हा एक विधी होता जो आता इव्हेंट बनला आहे. पूर्वी, विवाह समारंभ म्हणजे पवित्र विधी ज्याने दोन व्यक्तींना जोडल्यासारखे वाटत होते.रितीरिवाज आणि विधी ज्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना ओळखत होते, आणि विवाह देखील आदराचा विषय होता. पूर्वी हळद, मेंदी, हे सर्व घरातच केले जायचे आणि कुणाला याची माहितीही नव्हती. याआधी मंडपात कोणत्याही थाटामाटात होणारी लग्नेही लग्नेच होती आणि तेव्हाचे वैवाहिक जीवन खूप सुखाचे होते. पण समाज आणि सोशल मीडियाला शो ऑफच्या भूताने इतके पछाडले आहे की काय करावे आणि काय करू नये याची कोणालाच भान राहिले नाही. आपण एकमेकांपेक्षा अधिक आधुनिक आणि श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी लोकांनी टोकाचे प्रदर्शन सुरू केले आहे. आणि आता त्यात जीवघेणी स्पर्धा देखील सुरू झाली आहे. अठ्ठेचाळीस किलोच्या मुलीला पन्नास किलोचा लेहेंगा भारी वाटणार नाही का ? हा विचार कुणालाच.कधी पडला नाही , बाहेरचे जाऊ द्यात, घरातील आई वडिलांना पण हे लक्षात येतं नाही. आपल्या पालकांच्या चां...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

Image
  विवाह समारंभ नाही तर... ...संस्कार म्हणून साजरा करा ! समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे. काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने  लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु. उधळू लागले आहेत. आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत. आता तरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही. *१)  समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. *२)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. *३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. *४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही. *५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो. *६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत. *७) विवाह हा सोहळा नाही तर तो  'संस्कार'  आहे. १६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे. *८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला...