विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

 विवाह समारंभ नाही तर...

...संस्कार म्हणून साजरा करा !


समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे.

काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने  लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु. उधळू लागले आहेत.
आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत. आता तरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही.

*१) समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.

*२)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.

*३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत.

*४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही.

*५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो.

*६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत.

*७) विवाह हा सोहळा नाही तर तो 'संस्कार' आहे.
१६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.

*८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही.

*९) संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच.

*१०) इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे.

*११) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको.

*१२ ) वर-वधू यांना नेहमीचा उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.

*१३) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.

*१४) जेवणावळी, मानपान वरील खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.

*१५) आजची बचत उद्याची निर्मितीआहे बचतीला प्राधान्य दिले पाहिजे

*१६) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा.

*१७) क्रिकेट ५ दिवसाचा, वन-डे वरुन २०-२० वर आला.तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ?

*१८) मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.

*१९) कोरोनानंतर सर्व व्यावसायिकांनी त्यांचे भाव वाढवले आहेत.आपण मात्र बदल स्वीकारायला तयार नाही.

*२०) कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केलाच पाहिजे .

*२१) समाजातील उच्चपदस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.  विवाह समारंभा बाबतीत काळाची गरज म्हणून आपण सर्वांनीच सुधारक होण्याची गरज आहे. त्यामध्ये आपल्या पुढील पिढ्यांचे उज्वल भविष्य दडले आहे. उच्चशिक्षित आणि सामान्य लोक यांच्यामधील दरी वाढत चालली आहे; समाजातील लोक आपणांस आपले आदर्श मानतात. अशा वेळी सामाजिक सुधारणांचे नेतृत्व उच्च शिक्षितांनी केले पाहिजे.समाजाचे प्रबोधन करायला पाहिजे .

*२२) कोणते तरी सरकार कायदा करेल आणि मग  बदल होतील हा पोकळ आशावाद आहे. कायद्याबरोबर प्रबोधन आणि जनजागृती करावी लागेल. यासाठी  समाजातील उच्चमध्यम व मध्यमवर्गिय यांना महत्त्वाची जबाबदारी पारपाडावी लागेल.

चला तर मग सुधारणांची सुरुवात स्वतः पासून करुयात ! हळूहळू सर्व समाज बदलेल व एक दिवस समाजाची १००% प्रगती होईल !



👏👏👏👏👏
फक्त वाचू नका....!
विचारही करा....!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

https://patharvatmatrimony.blogspot.com

आपल्या विवाहेच्छु मुलामुलींची माहिती आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचण्यासाठी उत्कृष्ट व सुलभ मार्ग म्हणजे
पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग
created by
संजय धानके, कोपरगांव (9823222670)
आजच संपर्क करून आपल्या स्थळाची नांव नोंदणी करा.

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...