मानसिक घटस्फोट जोडीदारांच एकमेकांशी नाही पटलं की, ते एकमेकांचा रीतसर घटस्फोट घेतात. असे कोर्टात होणारे घटस्फोट आपणास ठाऊक आहेत. पण... मानसिक घटस्फोट..! ऐकायला जरा कसतरीच वाटत ना.! पण काही दिवसापूर्वी अशीच एक केस आली. एक पुरुष...ज्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली. पण दोघांचाही स्वभाव, लग्नाआधीच वातावरण, दोघांवर झालेले भिन्न भिन्न संस्कार यामुळे दोघांच कधी पटलंच नाही. त्यात त्याचा पुरुषी अहंकार! (जो त्याने स्वतः कबूल केला...) यामुळे मनाच एकरुप होणं त्याच्यात कधी झालंच नाही... त्याच्या तोंडून शब्द आला की, " आमचा तसा मानसिक घटस्फोट केव्हाच झाला आहे. पण लोक काय म्हणतील? घरचे लोक, नातेवाईक यांचा विचार करुन आम्ही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत जाऊ शकत नाही. यावर तुमच मत काय? " तसं मी त्यांच्याशी मला जे वाटत ते सांगितलं. पण राहून राहून ..."मानसिक घटस्फोट".... हा विषय डोक्यातून जाईना. कारण लग्न हा एक लकी ड्रॉ आहे. जोडीदार चांगला.... चांगला म्हणजे वेल सेटल्ड, सुंदर असा नव्हे.... तर चांगला म्हणजे समजून घेणारा, काळजी घेणारा आणि मु...