Posts

Showing posts from December, 2023

विनंती / सूचना / आवाहन

Image
  नमस्कार.. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी, इच्छुक मुलामुलींची माहिती होण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून भरपूर विवाह जुळले आणि झाले आहेत. बरेच जण या माध्यमाचा लाभ घेत आहेत. नांव नोंदवलेल्या बऱ्याच मुलामुलींचे विवाह होतात पण ब्लॉगमध्ये नाव तसेच राहते, करण त्यांची लग्न झाल्याची माहिती संबंधितांकडून कळत नाही. तरी ज्यांचे विवाह जुळले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला त्यांचे नाव ब्लॉगमधून कमी करता येईल, म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही.  *तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील (बऱ्याच स्थळांचे संपर्क फोन लागत नाहीत) तरी बदललेले नवीन नंबर मला कळवावे, तसेच स्थळाच्या माहितीत काही बदल, अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे आपल्या स्थळाचा विचार करणाऱ्याला सुलभ होईल. काही बदल नसला तरीही मला तसे कळवावे. बरेच दिवस झालेत पण ज्यांनी संपर्क केला नाही त्यांचे नांव ब्लॉगमधून कमी होईल व त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल. 1 जनेवरीनंतर न वीन अपडेट होईल तरी त्यापूर्वीच कळवावे.. * पाथरवट मॅट्रिमोनी *