Posts

Showing posts from April, 2024

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

Image
  विवाह समारंभ नाही तर... ...संस्कार म्हणून साजरा करा ! समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे. काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने  लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु. उधळू लागले आहेत. आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत. आता तरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही. *१)  समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. *२)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. *३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. *४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही. *५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो. *६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत. *७) विवाह हा सोहळा नाही तर तो  'संस्कार'  आहे. १६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे. *८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला...