Posts

टाळावा मानपान, कुप्रथांना नको स्थान...

Image

~ आमच्या चिमणीचे लग्न ~

Image
~आमच्या चिमणिचे लग्न~ (एका सत्य घटनेवर आधारीत) उल्हास हरी जोशी✍ एका टिपीकल, मध्यम वर्गीय, कोकणस्थ ब्राम्हण कुटुंबांत जन्मलेली चीमणी लहानपणापासुनच हुषार मुलगी म्हणुन ओळखली जात होती. तिला बहीण नाही. एक मोठा भाऊ आहे. तिचे आई वडील दोघेही नोकरी करणारे. दोघेही सरकारी नोकर. मोठा भाऊ बी.कॉम. झाला व एका को-ऑपरेटीव्ह बँकेत नोकरिला लागला. चीमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला इन्फोसीस मधे जॉब मिळाला. चांगले 4 लाखांचे पॅकेज मिळाले. तिचे आई वडील व भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती. वयाच्या 22 व्या वर्षी तिचा जॉब सुरु झाला. तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळे बघायला सुरवात केली. मुलगा कोकणस्थ ब्राम्हणच हवा, इंजिनीयरच हवा, आय.टी. किंवा सॉफ्टवेअर मधलाच हवा या ‘च’ अटिंनी मुले बघायला सुरवात झाली. पहिलेच स्थळ सांगुन आले ते त्यांच्या ‘च’ च्या अटींमधे फिट्ट बसणारे होते. मुलगा कोकणस्थ ब्राम्हण होता. इंजिनीयर होता. आय टी मधला होता. 6 लाखाचे पॅकेज असलेला होता. देखणा व रुबाबदार होता, पण.... या ‘पण’ नेच सगळा घोटाळा केला. मुलाचे वय होते 2...

पुनर्विवाह

Image
समाज बंधू भगिनींनो व लहान थोरांनो 👋 नमस्कार 👋 पाथरवट मॅट्रिमोनी चालू केल्यापासून मिळणारा प्रतिसाद आणि त्याचा झालेला फायदा पाहून चालू केलेल्या कार्याचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान आहे. त्याच बरोबर नवीन विचार आला आणि त्याची सुरवात केलीय, त्यालाही आपण साथ द्याल अशी अपेक्षा.. समाजातील काही अकाली झालेले विधवा, विधुर, घटस्फोटित अशांना पुन्हा एकदा त्यांचे जीवन नव्याने सुरू करण्यासाठी पुनर्विवाह हा एक पर्याय आहे, त्यांच्या जीवनात पुन्हा एक नवी सुरवात व्हावी आणि त्यांना जीवनात नवा आनंद मिळावा त्यांचे आयुष्य सुखरूप पार पडावे यासाठी सामाजिक प्रयत्न झाले पाहिजे... 👉 त्यासाठीच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांना इतर स्थळांची माहिती व्हावी व त्यांचीही माहिती इतरांना मिळावी म्हणून त्यांचा नवीन कॉलम तयार करीत आहे.. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा.. समाजातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन कायम असावे ही विनंती... ◆ आपला ◆ ~ संजय धानके, कोपरगाव ~ (मो.-9823222670) आपल्या सूचना व अभिप्राय मला मेसेज, व्हाट्सअप्प वर किंवा फोन करुन कळवावे...

👏👏👏👏👏💕💑💕💐

Image
नमस्कार समाज बंधू भगिनींनो.. आज पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू नं.4 प्रतिमा राजेंद्र केने आणि वर नं.3 प्रसाद बाळासाहेब धुमाळ, यांचा विवाहयोग जुळून आला आहे. 👏👏👏👏👏 ब्लॉग मार्फत विवाह जुळण्यास सुरवात झाली असून काही विवाह लवकरच संपन्न होत आहेत. ब्लॉगची उपयुक्तता सिद्ध होत असून या माध्यमातून समाजाला लाभ होत आहे ही समधनाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ब्लॉगचा उपयोग सर्वांना व्हावा, मुलामुलींना आयुष्याचा जोडीदार मिळावा, त्यांच्या पालकांना वर/वधू शोधण्यास होणारा त्रास कमी व्हावा तसेच तुमच्याकडे असणाऱ्या विवाहेच्छु मुलामुलींची माहिती सर्वांना मिळावी हाच हा ब्लॉग सुरू करण्यामागचा उद्देश आहे. समाजाच्या सुविधेसाठी तयार केलेल्या ब्लॉगला सर्वांनी भरपूर शुभेच्छा अन प्रतिसाद दिलाय आणि देताय याबद्दल सर्वांचे आभार...!! ✍ संजय धानके..
Image
नमस्कार.. प्रथमतः ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. या माध्यमातून चांगले कार्य घडो व सर्वांना आपला जोडीदार मिळो हीच अपेक्षा. सर्वांना एक विनंती आहे की, आपण माहिती देतांना थोडी विस्तृत दिली तर उत्तम राहील. उदा.- आई/वडिलांच्या नोकरी/व्यासायाबद्दल माहिती; मामाचे नाव, गांव; इतर माहिती मधे परिवारातील व्यक्तींचा अल्प परिचय असल्यास इतरांना आपली पारिवारिक माहिती होते. तरी आशा प्रकारे माहिती द्यावी. ज्यांनी पूर्वी दिली आहे त्यांनी पण देऊन अपडेट करावी. आपल्या सूचना व मार्गदर्शनाचे स्वागतच आहे. (कुणाला काही माहिती हवी असल्यास मला फोन करावा..) धन्यवाद...! आपलाच- संजय धानके ( 9823222670 )

सुस्वागतम...

Image
पाथरवट वधू वर सूचक संकेत स्थळावर आपले स्वागत... आपल्या समाजातील इच्छित वधू-वर यांची माहिती एका ठिकाणी मिळण्यासाठी patharvatmatrimony.blogspot.com हा ब्लॉग तयार करीत आहोत. आपल्याकडे असलेल्या वधू/वारांची माहिती इतरांना व्हावी व आपणास माहीत नसलेल्या वधू/वरांची माहिती आपल्याला मिळावी, जेणेकरून त्यांना योग्य जोडीदार निवडण्यास मदत होईल, या उद्देशाने हा ब्लॉग तयार करीत आहोत. तरी ज्या कोणास आपल्या इच्छित वधू/वरांची माहिती यावर द्यायची आहे त्यांनी कृपया 09823222670 या मोबाईल वर sms किंवा whatsap किंवा फोन करून #खलील प्रमाणे माहिती द्यावी.  *एक सामाजिक उपक्रम म्हणून या कार्याकडे पाहावे. धन्यवाद..! आपला नम्र संजय धानके, कोपरगाव ___________________________________ ___________________________________________ ___________________________________ # नाव - जन्म तारीख - जन्म वेळ - जन्म गाव - उंची - रक्त गट - शिक्षण - नोकरी/व्यवसाय - आई/ वडील - (नाव, व्यवसाय/नोकरी) भाऊ/बहीण मामा - (नाव, गाव) मुळगाव - पत्ता - संपर्क फोन - इतर माहिती -