Posts

शुभ विवाह

Image
पाथरवट मॅट्रिमोनि वर जमलेले तीन विवाह लवकरच संपन्न होत आहेत... 📯🥁💃🕺🥁🎺

पाथरवट सारा एक...

Image
दि. १४/२/२०२०, सटाणा येथे चि. निखिल चंद्रकांत टोरपे (नाशिक) आणि चि.सौ.का. पूनम रामदास चव्हाण (दरेगाव, सटाणा) यांच्या विवाहास उपस्थित होतो. पाथरवट वधुवर मेळावा आणि पाथरवट मॅट्रिमोनि चे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल, की दोन भिन्न विभागातील पाथरवट समाज आज या विवाहाने जोडला गेला आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातील सर्व भागातील समाज खऱ्या अर्थाने आता जोडला गेला आहे. मेळाव्यास दोन्ही परिवार उपस्थित होते, त्यांनी घेतलेला निर्णय हा नक्कीच ऐतिहासिक होणार आहे. या पूर्वी पण असे प्रयत्न झालेत पण यश आज आले त्या बद्दल दोन्ही परिवाराचे विशेष कौतुक आणि वधूवरांस वैवाहिक जीवनास शुभेच्छा..! 💐 संजय धानके (विमा प्रतिनिधी) अध्यक्ष : पाथरवट समाज, कोपरगांव संचालक : पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ पाथरवट सारा एक  हा मंत्र घेऊन २००६ पासुन महाराष्ट्रातील च नाही तर देशभरातील हिंदु पाथरवट एका मंचावर यावेत यासाठी अ.भा.पाथरवट समाज महासंघाचे कार्य सुरु झाले, आज ह्या विवाहामुळे  महाराष्ट्रातील ज्ञात असलेले पाचही गट रोटी व्यवहारच नाही तर बेटी ...

अभिनंदनीय..

Image
अभिनंदन.. 📯🥁🎺💏🎺🥁🎷 💐 पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग मधील वधू क्र. १०९ शितल चंद्रकांत टोरपे, पुणतांबा आणि वर क्र. ५६ मेहुलकुमार हर्षदराव डोंगरे, जंबुसर ❤️ यांचा लवकरच शुभ विवाह संपन्न होत आहे. उभयतांना शुभेच्छा आणि  पुढील वैवाहिक जीवनास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏 आपणही आपल्या स्थळाचे नांव या ब्लॉगमध्ये नोंदवून आपल्या स्थळासाठी योग्य जोडीदार निवडा.. आजच नांव नोंदणी करा.. तीही मोफत.. 👌 संपर्क संजय धानके  अध्यक्ष : पाथरवट समाज, कोपरगांव मो. - 9823222670

शुभ-विवाह

Image
--शुभ विवाह-- वर क्र. 14 सुनील अरुण भोईर वधू क्र. 66 मोनिका रामकृष्ण केने 💏 8 मार्च 2020 रोजी विवाहबद्ध होत आहेत. दोघांचे खूप अभिनंदन..! त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.! 💐💐🎷🥁🎷🎺🥁🎺🎷🥁🎷💐💐

शुभ विवाह

Image
पाथरवट मॅट्रिमोनिवर तीन विवाह नुकतेच जुळलेत, आणि लवकरच विवाहबद्ध होत आहेत.. 💏 वधू क्र. १० + वर क्र. १२ वधू क्र. ६७ + वर क्र. ४६ वधू क्र. ६६ + वर क्र. १४ 🥁🎷🥁🎷🥁🎷🥁🎷🥁 आपल्या स्थळास योग्य वधुवर शोधण्यास पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग आहे ना.. आजच आपल्या स्थळाचे नांव ब्लॉगवर नोंदवा.. संपर्क - 9823222670 (संजय धानके)
Image
वर क्र. 107 वधू क्र. 28 लवकरच विवाहबद्द होत आहेत. त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.! 🎷🥁🎷🎺🥁🎺🎷🥁🎷

सूचना

नमस्कार.. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी, इच्छुक मुलामुलींची माहिती होण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या माध्यमातूनच पाथरवट वधुवर परिचय मेळावा पण घेण्यात आला होता, त्यानंतर काही विवाह जुळले आणि झाले देखील.. पण बऱ्याच वधूवरांचे विवाह जमतात, होतात पण ब्लॉगमध्ये नाव तसेच राहते, करण त्यांची लग्न जमल्याची माहिती मिळत नाही. तरी ज्यांचे विवाह जुळले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला त्यांचे नाव कमी करता येईल, म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही.  *तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील (बऱ्याच स्थळांचे संपर्क फोन लागत नाहीत) तरी बदललेले नवीन नंबर मला कळवावे, तसेच स्थळाच्या माहितीत काही बदल, अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे आपल्या स्थळाचा विचार करणाऱ्याला सुलभ होईल. धन्यवाद..! आपला- संजय धानके (विमा प्रतिनिधी) (अध्यक्ष- पाथरवट समाज, कोपरगाव) मोबा.- 9823222670