Posts

अभिनंदन

Image
  पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच आहे... लॉकडाउन मूळे विवाह समारंभ आणि इतर संबंधित कार्यक्रम थोडेसे शिथिल झाले होते, पण आता जसजशी सूट मिळत आहे तसे विवाह जुळणे आणि लग्नसमारंभ सुरू होत आहेत. लॉकडाउन मुळे उपस्थिती कमी ठेवावी लागते आहे. त्यामुळे बहुतेक वेळा घरचेच संख्येने पूर्ण होत आहेत.. असाच एक विवाह नुकताच जमला आहे आणि लवकरच ते मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत आहेत.. उभयतांना त्यांच्या भावी जीवनांस हार्दिक शुभेच्छा... वर क्र. 129 चि. रोहित प्रमोद धानके आणि वधू क्र. 75 कु. एकता संजय काळण

गोष्ट लग्नाची : प्रश्न आयूष्याचा - मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?

Image
  मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?               मुलीचे वय मुलापेक्षा कमी असणे गरजेचे आहे व यास वैज्ञानिक कारण आहे. साधारण पाच वर्षाचे अंतर असावे. याची कारणमीमांसा वैवाहिक जीवनाच्या दोन भागात विभागली जाते. एक लक्षात घेणे आवश्यक आहे की विवाहा चा निर्णय शिल्लक संपुर्ण आयुष्याचा विचार करून घेतला जातो.              मुलाचे वय विवाहाच्या वेळेस सरासरी पंचवीस वर्षे असेल तर तो आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झालेला असतो व स्वतंत्र संसार करण्यास सक्षम असतो. त्याच वेळी त्याची भावी पत्नी वीसीत असेल तर तीचे पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण झालेले असते व संसार करण्याची मानसीक तयारी झालेली असते.या वयापर्यंत अल्लडपणा कमी झालेला असतो.              आता सर्वात महत्वाचा भाग जो शरीरविज्ञानाशी संबधीत आहे. साधारण पंचेचाळीशीच्या आसपास स्त्रीची रजोनिवृत्ती होते. या काळात स्त्रिया मानसिक दृष्ट्या खुप दोलायमान/ लहरी असतात. आपले कामजीवन संपुष्टात आल्याची तीव्र जाणिव मनामध्ये असते. या नाजूक काळात तीला समजून घेण्याच...

जागतिक पर्यावरण दिन त्या निमित्त

Image
आज ५ जून - जागतिक पर्यावरण दिन भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याचा आदर केला गेला आहे. पर्वत, नद्या, झाडे, सूर्य-चंद्र आणि पंचतत्त्वे या सर्वांची पूजा केली गेली आहे. पंचतत्त्वातील पाचही तत्त्वे एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहेत. त्यातील एक प्रदूषित झाल्यास त्याचा परिणाम इतर चारांवरही होतो. त्यामुळे मानवाने आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत सर्व उत्सव साजरे करायला हवेत. खरेतर जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीमध्ये अशाच प्रकारे निसर्गाबद्दल आदरभाव दिसून येतो. आज मानवी मनाला तणावमुक्त करून, दूर सारून हा श्रद्धाभाव परत आणण्याची तसेच पर्यावरण रक्षणात समाजाचा सहभाग मिळवण्याची आणि पर्यावरणाबद्दल त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. पर्यावरण आणि विवाह सोहळे विवाह सोहळा… म्हणजे पारंपरिक विधी, थाटमाट… अंगतपंगत… रुखवत… मंगल अक्षता… या सगळ्यांची रेलचेल… आजच्या महागाईच्या काळातही अशा पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर विधी आनंदाने पार पडतात… वधु-वरांसह पै पाहुणे सगळेच जण यामध्ये आनंदाने सहभागी होतात, मात्र सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या युगात या ...

लॉकडाउन अभिनंदन

Image
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच आहे... लॉकडाउन मूळे विवाह समारंभ आणि इतर संबंधित कार्यक्रम थोडेसे शिथिल झालेले असतांना पण काही विवाह जमत आहे.. असाच एक विवाह नुकताच जमला आहे आणि लवकरच ते मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत आहेत.. बऱ्याच समाजबांधवांनी या ब्लॉगचा लाभ घेतला आहे.  सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थितीत आपल्या स्थळांची माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास या ब्लॉगचे मध्यम अतिशय उपयुक्त ठरत आहे. तरी विवाहेच्छूक मुलामुलींनी व त्यांचे पालकांनी या ब्लॉगचा लाभ घेण्याची संधी सोडू नये. ही सेवा मोफत आहे फक्त आपल्याला एक फोन / मेसेज करायचा आहे व नाव नोंदवायचे आहे. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू क्र. 33 कु. नम्रता दिनेश लायरे आणि वर क्र. 67 चि. विनायक (विनोद) सदाशिव खारे हे 03/05/2021 रोजी विवाहबद्ध होत आहेत . 💐💐💐 पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे उभयतांचे अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनास  हार्दिक शुभेच्छा..! 🙏🙏🙏 लॉकडाउन मुळे मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. 💞 आपला संजय धानके (9823222670)

अभिनंदन...

Image
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच असून, बऱ्याच समाजबांधवांनी या ब्लॉगचा लाभ घेतला आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून सुरू केलेला हा ब्लॉग चांगलाच नावारूपाला व प्रसिद्धीस आला आहे. सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थितीत या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या स्थळांची माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास सुलभ होत आहे. विवाहेच्छूक मुलामुलींनी व त्यांचे पालकांनी या ब्लॉगचा लाभ घ्यावा, ही सेवा मोफत आहे.  या माध्यमातून समाजाची सेवा करता येते यातच मला समाधान आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 🔅〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🔅 पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू क्र. 124 कु. नयना गिरीश भोईर आणि वर क्र. 137 चि. गौरव विजय डुकरे लवकरच 24/12/2020 रोजी विवाहबद्ध होत आहेत. https://rebrand.ly/nayana-weds-gaurav पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे उभयतांचे अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनास  हार्दिक शुभेच्छा..! 🙏🙏🙏 🤝 तसेच 🤝 पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू क्र. 56 कु. मोनल अनिल भोईर आणि वर क्र. 8 चि. प्रसाद चंद्रकांत भुसारे हे 03/01/2021 रोजी विवाहबद्ध होत आहेत. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे उभयतांचे अभ...

समाजोपयोगी उपक्रम

Image
 🙏🏻🙏🏻 अतिशय समाजोपयोगी उपक्रम! आजही एकदोन गटातील काही कार्यकर्ते फक्त आपापल्या गटापुरते वधुवर परीचय पत्र भरुन घेऊन  पाथरवट समाजाला फक्त गटापुरते मर्यादित ठेवत असताना " पाथरवट मॅट्रीमनी ब्लाॅग " महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व गटातील वधुवरांंची नावे नोंदवुन घेऊन एक सशक्त पर्याय उभा करण्याचे अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघाचेच पाथरवट समाज एकत्रिकरण ब्रिद आपल्या पहिल्या वधुवर परीचय मेळाव्यापासुनच पुढे नेण्यासाठी कटिबध्द आहे याचा अतिव आनंद व्यक्त करतो व *पाथरवट मॅट्रीमनी ब्लाॅग* व त्याचे *संयोजक श्री.संजयजी धानके कोपरगाव* व त्यासाठी त्यांसोबत ठामपणे उभे राहणारे *पाथरवट समाज मंडळ कोपरगाव चे समस्त कार्यकर्ते* आणि याला मनापासून पाठिंबा देणारे *अ.भा.पाथरवट समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते* यांचे पण यासाठी मनापासून अभिनंदन करतो. @ उध्दवराव विश्राम काळे नाशिक सरचिटणीस अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघ   श्री. उद्धव विश्राम काळे ---------------------------- संजय धानके व श्री. उद्धव विश्राम काळे _______________________________

😷लॉक डाउन 😪

Image
नमस्कार समाज बंधू भगिनींनो          जागतिक महामारी मुळे जगावर आलेल्या संकटातून सावरत सावरत आता सहा महिने होत आलेत.. लॉकडाउन पण आताशा संपत चाललाय.. हळू हळू सर्व जनजीवन सुरू होईल.. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेन की लॉकडाउन मध्येही विवाह होणे बंद नव्हते.. मोजक्या नातलागत, कमी खर्चात, एकदम व्यवस्थित पणे विवाह होऊन नावदाम्पत्यांनी संसार सुरू केलेत.. डामडौल महत्त्वाचा नाही तर मुलामुलींचे संसार सुरू होतायत हे महत्वाचे..          या लॉकडाउनच्या काळात कुठे स्थळ पाहायला जाता येत नव्हते, पण आपल्या पाथरवट मॅट्रिमोनी वर नांव नोंदणी चालूच होती आणि आहे, विवाह जमत आहेत.. तेव्हा कोरोना महामारीच्या संकटात लॉकडाउनमध्येही आपल्याला पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मदतीला आहे.. तेव्हा आपल्या स्थळाचे नाव पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगवर नोंदवा आणि आपल्या पसंतीचे स्थळ शोधा..  नुकताच वर क्र. 08 आणि वधू क्र. 55 यांचा विवाह जमला आहे..         Visit - https://patharvatmatrimony.blogspot.com आपल्या सेवेत संजय धानके