Posts

लग्न कधी कसे जमणार 🤔 विचार करा..

Image
लग्न कधी कसे जमणार मुलगा पाहतांना... कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको  घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको  शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको मैत्रीदोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार ? संसार कुणाबरोबर करणार ? आई/ वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ? बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणा...

अभिनंदन...💐

Image
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वर क्र. 04 चि. अमोल दिलीप दर्वे (संगमनेर) आणि वधू क्र. 81 कु. पौर्णिमा रमेश डोंगरे (कोपरगांव) यांचा नुकताच वाङ्निश्चय संपन्न झाला आहे आणि लवकरच ते विवाहबद्ध होत आहेत त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनास ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा..! 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 आजच आपल्या विवाहेच्छू मुलामुलींची नांवे  ब्लॉगमध्ये नोंदवून आपल्या आवडीचे योग्य स्थळ मिळवा नांव नोंदणी साठी संपर्क करा संजय धानके : 9823222670

विनंती

Image
नमस्कार.. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी, इच्छुक मुलामुलींची माहिती समाजबांधवांना होण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. गेल्या ४ वर्षांपासून ही सेवा मोफत चालू आहे. या माध्यमातून बरेच विवाह जुळले आणि झाले देखील आहेत.. ही सेवा अशीच अविरत देण्याचा माझा मानस आहे. तेव्हा विवाहेच्छू मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी आपल्या आवडीनुसार योग्य स्थळ शोधण्यासाठी या ब्लॉगवर नांव नोंदणी करून लाभ घ्यावा.. एक विनंती आहे की, ज्यांचे विवाह जुळले/झाले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला त्यांचे नाव कमी करता येईल, आपल्यालाही त्याचा त्रास होणार नाही.. बऱ्याच वेळा ज्यांचे विवाह जमलेत/झालेत, पण त्यांचे नांव ब्लॉगमध्ये तसेच राहते, करण त्यांची लग्न जमल्याची/झाल्याची माहिती मला मिळत नाही. *तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील (बऱ्याच स्थळांचे संपर्क फोन लागत नाहीत) तरी बदललेले नवीन नंबर मला कळवावे, तसेच स्थळाच्या माहितीत काही बदल, अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे आपल्या स्थळाचा विचार करणाऱ्याला सुलभ होईल. धन्यवाद..! आपला- संजय धानके (विमा प्रतिनिधी) पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग निर्म...

अभिनंदन

Image
  पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच आहे... लॉकडाउन मूळे विवाह समारंभ आणि इतर संबंधित कार्यक्रम थोडेसे शिथिल झाले होते, पण आता जसजशी सूट मिळत आहे तसे विवाह जुळणे आणि लग्नसमारंभ सुरू होत आहेत. लॉकडाउन मुळे उपस्थिती कमी ठेवावी लागते आहे. त्यामुळे बहुतेक वेळा घरचेच संख्येने पूर्ण होत आहेत.. असाच एक विवाह नुकताच जमला आहे आणि लवकरच ते मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत आहेत.. उभयतांना त्यांच्या भावी जीवनांस हार्दिक शुभेच्छा... वर क्र. 129 चि. रोहित प्रमोद धानके आणि वधू क्र. 75 कु. एकता संजय काळण

गोष्ट लग्नाची : प्रश्न आयूष्याचा - मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?

Image
  मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?               मुलीचे वय मुलापेक्षा कमी असणे गरजेचे आहे व यास वैज्ञानिक कारण आहे. साधारण पाच वर्षाचे अंतर असावे. याची कारणमीमांसा वैवाहिक जीवनाच्या दोन भागात विभागली जाते. एक लक्षात घेणे आवश्यक आहे की विवाहा चा निर्णय शिल्लक संपुर्ण आयुष्याचा विचार करून घेतला जातो.              मुलाचे वय विवाहाच्या वेळेस सरासरी पंचवीस वर्षे असेल तर तो आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झालेला असतो व स्वतंत्र संसार करण्यास सक्षम असतो. त्याच वेळी त्याची भावी पत्नी वीसीत असेल तर तीचे पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण झालेले असते व संसार करण्याची मानसीक तयारी झालेली असते.या वयापर्यंत अल्लडपणा कमी झालेला असतो.              आता सर्वात महत्वाचा भाग जो शरीरविज्ञानाशी संबधीत आहे. साधारण पंचेचाळीशीच्या आसपास स्त्रीची रजोनिवृत्ती होते. या काळात स्त्रिया मानसिक दृष्ट्या खुप दोलायमान/ लहरी असतात. आपले कामजीवन संपुष्टात आल्याची तीव्र जाणिव मनामध्ये असते. या नाजूक काळात तीला समजून घेण्याच...

जागतिक पर्यावरण दिन त्या निमित्त

Image
आज ५ जून - जागतिक पर्यावरण दिन भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याचा आदर केला गेला आहे. पर्वत, नद्या, झाडे, सूर्य-चंद्र आणि पंचतत्त्वे या सर्वांची पूजा केली गेली आहे. पंचतत्त्वातील पाचही तत्त्वे एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहेत. त्यातील एक प्रदूषित झाल्यास त्याचा परिणाम इतर चारांवरही होतो. त्यामुळे मानवाने आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत सर्व उत्सव साजरे करायला हवेत. खरेतर जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीमध्ये अशाच प्रकारे निसर्गाबद्दल आदरभाव दिसून येतो. आज मानवी मनाला तणावमुक्त करून, दूर सारून हा श्रद्धाभाव परत आणण्याची तसेच पर्यावरण रक्षणात समाजाचा सहभाग मिळवण्याची आणि पर्यावरणाबद्दल त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. पर्यावरण आणि विवाह सोहळे विवाह सोहळा… म्हणजे पारंपरिक विधी, थाटमाट… अंगतपंगत… रुखवत… मंगल अक्षता… या सगळ्यांची रेलचेल… आजच्या महागाईच्या काळातही अशा पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर विधी आनंदाने पार पडतात… वधु-वरांसह पै पाहुणे सगळेच जण यामध्ये आनंदाने सहभागी होतात, मात्र सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या युगात या ...

लॉकडाउन अभिनंदन

Image
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच आहे... लॉकडाउन मूळे विवाह समारंभ आणि इतर संबंधित कार्यक्रम थोडेसे शिथिल झालेले असतांना पण काही विवाह जमत आहे.. असाच एक विवाह नुकताच जमला आहे आणि लवकरच ते मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत आहेत.. बऱ्याच समाजबांधवांनी या ब्लॉगचा लाभ घेतला आहे.  सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थितीत आपल्या स्थळांची माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यास या ब्लॉगचे मध्यम अतिशय उपयुक्त ठरत आहे. तरी विवाहेच्छूक मुलामुलींनी व त्यांचे पालकांनी या ब्लॉगचा लाभ घेण्याची संधी सोडू नये. ही सेवा मोफत आहे फक्त आपल्याला एक फोन / मेसेज करायचा आहे व नाव नोंदवायचे आहे. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधील वधू क्र. 33 कु. नम्रता दिनेश लायरे आणि वर क्र. 67 चि. विनायक (विनोद) सदाशिव खारे हे 03/05/2021 रोजी विवाहबद्ध होत आहेत . 💐💐💐 पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग तर्फे उभयतांचे अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनास  हार्दिक शुभेच्छा..! 🙏🙏🙏 लॉकडाउन मुळे मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. 💞 आपला संजय धानके (9823222670)