Posts

विवाह संस्कार

Image
विवाह समारंभ नाही तर संस्कार म्हणून साजरा करा समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे. काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने  लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु. उधळू लागले. आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत. आता तरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही. *१) समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. *२)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. *३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. *४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही. *५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो. *६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत. *७) विवाह हा सोहळा नाही तर तो 'संस्कार' आहे. १६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे. *८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही. *९) सं...

ऐका हो ऐका..😄😄

Image
  नवरदेवांचा मोर्चा बातमी पाहण्यासाठी खलील लिंक ओपन करा.. https://fb.watch/hBvE_2Jk81/

मानसिक घटस्फोट

Image
मानसिक घटस्फोट           जोडीदारांच एकमेकांशी नाही पटलं की, ते एकमेकांचा रीतसर घटस्फोट घेतात. असे कोर्टात होणारे घटस्फोट आपणास ठाऊक आहेत. पण... मानसिक घटस्फोट..! ऐकायला जरा कसतरीच वाटत ना.! पण काही दिवसापूर्वी अशीच एक केस आली.           एक पुरुष...ज्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली. पण दोघांचाही स्वभाव, लग्नाआधीच वातावरण, दोघांवर झालेले भिन्न भिन्न संस्कार यामुळे दोघांच कधी पटलंच नाही. त्यात त्याचा पुरुषी अहंकार! (जो त्याने स्वतः कबूल केला...) यामुळे मनाच एकरुप होणं त्याच्यात कधी झालंच नाही... त्याच्या तोंडून शब्द आला की, " आमचा तसा मानसिक घटस्फोट केव्हाच झाला आहे. पण लोक काय म्हणतील? घरचे लोक, नातेवाईक यांचा विचार करुन आम्ही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत जाऊ शकत नाही. यावर तुमच मत काय? "  तसं मी त्यांच्याशी मला जे वाटत ते सांगितलं. पण राहून राहून ..."मानसिक घटस्फोट".... हा विषय डोक्यातून जाईना. कारण लग्न हा एक लकी ड्रॉ आहे. जोडीदार चांगला.... चांगला म्हणजे वेल सेटल्ड, सुंदर असा नव्हे.... तर चांगला म्हणजे समजून घेणारा, काळजी घेणारा आणि मु...

वरमाला घालायची खूप छान आणि सुंदर पद्धत..

Image
 वरमाला घालायची खूप छान आणि सुंदर पद्धत...  पण आजकाल मुलं-मुली वर-खाली होत राहतात आणि वरमालाच्या कार्यक्रमाची खिल्ली उडवतात... हे चुकीचं आहे... हा बदल आपण सर्वांनी मिळून घडवायचा आहे..  चला आता आपण सर्व जण मिळून हा बदल घडवून आणू, आणि आपल्या धर्माची प्रतिष्ठा राखू... 🚩🚩

तुळशी विवाह

Image
तुळशी विवाहानंतर आपल्याकडे लग्नसराई सुरू होते. जाणून घ्या तुळशी विवाहबद्दल माहिती.. तुळशी विवाह  हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे  तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीला...

विनंती

Image
  नमस्कार.. पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी, इच्छुक मुलामुलींची माहिती होण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या माध्यमातूनच पाथरवट वधुवर परिचय मेळावा पण घेण्यात आला होता, त्यानंतर काही विवाह जुळले आणि झाले देखील.. पण बऱ्याच वधूवरांचे विवाह जमतात, होतात पण ब्लॉगमध्ये नाव तसेच राहते, करण त्यांची लग्न जमल्याची माहिती मिळत नाही. तरी ज्यांचे विवाह जुळले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला त्यांचे नाव कमी करता येईल, म्हणजे आपल्यालाही त्रास होणार नाही.  *तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील (बऱ्याच स्थळांचे संपर्क फोन लागत नाहीत) तरी बदललेले नवीन नंबर मला कळवावे, तसेच स्थळाच्या माहितीत काही बदल, अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे आपल्या स्थळाचा विचार करणाऱ्याला सुलभ होईल. काही बदल नसला तरीही मला तसे कळवावे. बरेच दिवस झालेत पण ज्यांनी संपर्क केला नाही त्यांचे नांव ब्लॉगमधून कमी होईल व त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल. patharvatmatrimony.blogspot.com

काही विवाह संस्थे वाले फोन करतात त्यापासुन सावध रहा

Image
🙏काही विवाह संस्थे वाले फोन करतात त्यापासुन सावध रहा.🙏🏻 सध्या काही भागातील विवाह संस्थेवाले फोन करून स्थळ सुचवीत आहेत. त्यांचे फोन आले तर पुर्ण माहिती नाव व गाव जिल्हा विचारुन घ्या, तिकडील एकदोन कार्यकर्ते यांची नावे विचारा व त्यानंतर खात्री करुनच माहिती द्या. गरज पडली व शंका आली तर खलील नंबरवर अवश्य मेसेज टाका किंवा फोन करा. जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद , पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात हिंदु पाथरवट समाज आहे. काही विवाह संस्था आपल्या ब्लॉगवरून माहिती घेऊन संपर्क करतात व स्थळ सुचवितात मात्र स्थळाची पूर्ण माहिती देत नाहीत व माहिती देण्यासाठी नांव रजिस्टर करायला सांगतात व फी आकारतात. असे फोन अल्येल्यांनी मला या बाबत चौकशी केली आहे. सदर विवाह संस्था चालकांचा तो बिझनेस आहे. तरी असे फोन आल्यास पैशाचा व्यवहार करू नये तसेच परिचित व्यक्तींना मध्यस्थी करावे. परस्पर माहिती देऊ नये. मॅट्रिमोनि संस्थेची पुर्णपणे खात्री करा, गुगलवर सर्च करा, आसपास चौकशी करा, संस्थेची माहिती घ्या. श्री. उद्धव काळे साहेब किंवा मला चौकशी करावी. आ...