समाज बंधू भगिनींनो व लहान थोरांनो 👋 नमस्कार 👋 पाथरवट मॅट्रिमोनी चालू केल्यापासून मिळणारा प्रतिसाद आणि त्याचा झालेला फायदा पाहून चालू केलेल्या कार्याचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान आहे. त्याच बरोबर नवीन विचार आला आणि त्याची सुरवात केलीय, त्यालाही आपण साथ द्याल अशी अपेक्षा.. समाजातील काही अकाली झालेले विधवा, विधुर, घटस्फोटित अशांना पुन्हा एकदा त्यांचे जीवन नव्याने सुरू करण्यासाठी पुनर्विवाह हा एक पर्याय आहे, त्यांच्या जीवनात पुन्हा एक नवी सुरवात व्हावी आणि त्यांना जीवनात नवा आनंद मिळावा त्यांचे आयुष्य सुखरूप पार पडावे यासाठी सामाजिक प्रयत्न झाले पाहिजे... 👉 त्यासाठीच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांना इतर स्थळांची माहिती व्हावी व त्यांचीही माहिती इतरांना मिळावी म्हणून त्यांचा नवीन कॉलम तयार करीत आहे.. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा.. समाजातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन कायम असावे ही विनंती... ◆ आपला ◆ ~ संजय धानके, कोपरगाव ~ (मो.-9823222670) आपल्या सूचना व अभिप्राय मला मेसेज, व्हाट्सअप्प वर किंवा फोन करुन कळवावे...