कपड्यांचा आहेर - एक मूर्खपणा
कपड्यांचा आहेर - एक मुर्खपणा
साधारण एका गरीब घरचं लग्न म्हटलं तरी किमान आहेरात मोडल्या जाणाऱ्या साड्या ह्या दीडशेच्या आसपास लागतातच. ही आहेरात दिली जाणारी साडी शे-दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास असते. त्याची गुणवत्ता महत्वाची नसते फक्त एक परंपरा म्हणून समाजाच्या बोकांडी बसवुन ती साडी वाटली जाते किंवा वाटायला भाग पाडली जाते. बरं ही आहेराची साडी एखाद्या स्रीला चुकुन जर लग्नाच्या मंडपात देण्यात आली नाही तर त्या संबंधित वरमायला ती ही तशीच तिच्या कार्यात जशास तसा म्हणून तिला टोमणा मारुन धडा देते. हे मानपान सन्मान इतके पागंतात की वधु वराला कोणी खाक मानत नाही.
हा लग्न नावाचा धडाकेबाज event नेमका कोणासाठी असतो हा मात्रा संशोधनाचा विषय आहे. बरं मानापानावरून लटकणारे ह्यांचे चमकीदार नाक.. आहेराची साडी मिळाली म्हणून काय घरी वापरणार ? नाही ती as it is दुसऱ्या पाहुण्यांच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात आहेर म्हणुनच forward केली जाईल किंवा त्या साडीला भांड्यावाल्याला देऊन प्लास्टीकचे डबे, मग्गे, बकेटी घेणे किंवा पापड, कुर्डया, शेवया, वाळत घालण्यासाठी तरी वापरात आणतील !
इतक्या क्षुल्लक कारणासाठी जर ह्या आहेराच्या साड्याचा वापर होत असेल तर ह्या स्रियां मानपानाच्या नावाखाली एकमेकांना इतकं का torture करुन घेतात ? असो...!
पण ह्या क्षुल्लक कारणासाठी आमची अर्थव्यवस्था कशी बिघडते ते तर बघावं ना ?
साधारण 200 रु. ची साडी अशा किमान 150 साड्या म्हटल्या तर त्यात एका कुंटुंबाचे सहजच 30,000 रु. जातात. त्या पाढंऱ्या टोप्या नी उपरने ज्याला कोणी आजकाल लहाण लेकराचं ढुगंन पुसायलाही वापरत नाही त्यासाठी परत 150 लोकासाठी
10,000 रु. पर्यंत खर्च म्हणजे एका कुंटुंबाचे एका लग्न कार्यात या परंपरेत कमीतकमी 40,000-50,000 (किंबहुना जास्त) विनाकारण खर्च होतात. ज्यांच्या साठी हा खर्च केला जातो ते त्या वस्तुच्या वापराला कवडीची किमंत देत नाही. कारण त्या वस्तुची उपयोगिता अर्थातच किमतीनुसार सुमारच असते.
पण आम्ही खर्च करतो आणि याचा फायदा आम्हाला होतो का?- नाही. मग हा फायदा कोणाला होतो? तर कापड निर्मिती कारखाने व त्याचे होलसेलर ज्या विशिष्ट समुहांच्या कब्जात पंरपरंने आहे त्या मुठभरांचा होतो. याचा बारकाईने विचार करावा. ह्या आहेराच्या फाजील व्यवहारात आपल्या शोषित वर्गाची अर्थशक्ती (economy power ) किती कमी होते? ह्यासाठी एक छोटसं गणित करा. साधारण दरवर्षी शोषित समुहाचे 15000 लग्न होत असतील तर 15000×40,000 = 600,000,000 (साठ कोटी). अबबब... दरवर्षी साठ कोटी..!! इतका अनावश्यक पंरेपरेच्या नावाखाली, दुय्यम दर्जाच्या कपड्यात खर्च होतो. ही सर्व ढोबळ आकडेवारी आहे. तरीही इतका मोठा खर्च. आपण कमावतो त्या पैश्यातुन जे खरेदी करतो त्याची उपयोगिता (utility) मिळवता आली पाहिजे नाही तर तो खर्च म्हणजे दुसऱ्या मुठभरांची अर्थव्यवस्था भक्कम करण्याचा आपला निष्पाप प्रयत्न असु शकतो.
उत्पादनशिलता, उपयोगिता व आपल्या शोषितांच्या अर्थव्यवस्थेतच आपल्या उत्पन्नाचा विनियोग करून आर्थिक साक्षरता व आर्थिक प्राबल्यतेच्या दृष्टीने एक पाऊल टाकलं पाहिजे. आपल्या खर्चाचा योग्य विनियोग झाला पाहिजे.
प्रत्येक छोट्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे.
_________________________________________❇✴❇✴❇✴❇✴❇✴❇✴❇✴❇✴❇✴❇✴❇