आपण कुठे चाललो आहोत..?
👉
आपण कधी विचार करणार आहोत की नाही..?
सध्या लग्नसराई जोरात आहे. कारण नसताना एकमेकांची स्पर्धा करून ज्याची क्षमता नाही तोही कर्ज काढून थाटामाटात लग्न करण्याचा प्रयत्न करतोय.
हे सगळीकडेच सुरू आहे पण आम्ही अनेक अतिशय चुकीच्या पध्दती सुरू केल्यात, त्यात संस्कृती परंपरा जपण्याऐवजी उध्वस्त होत आहे.
👉
पत्रिका नव्हे हँडविल..
घरातील लग्न कार्य गावकी, भावकी व नातेवाईक आणि जवळच्या मित्र मंङळीसाठी असते. ज्या पुढा-यांची, नेत्यांची आपली साधी ओळखही नाही त्यांची आपण नावे टाकतो आणि त्यांनी याव यासाठी अतिआग्रह करत बसतो. पत्रिकांचे आम्ही हॅन्ङवील करून बसलोत. पैसा आहे म्हणून लाखो रू. यावर खर्च करतो आहोत. कधी पत्रिकेत जेवढी नावे तेवढीही माणसे लग्नात नसतात हे कटु सत्य आहे.
👉
वेळेची अवेळ राष्ट्राचे नुकसान करणारी
जगातले प्रगत देश आपल्या प्रत्येक कृतीला राष्ट्रहिताचे दृष्टीने महत्व देतात. आम्ही फक्त आमचेच हित पाहतो. लग्नासाठी हजार लोक येवून बसलेले आणि दहावीस पोर मिरवणुकीत नाचत बसतात. त्यातली निम्मी शुध्दीत नसतात.ती एक तास लग्न लेट करतात.आणि तरीही निवेदक (आपले पाकीट नीट मिळावे म्हणून) एकसारखे स्वागतच करत असतो.नसलेल्या पदव्या लावून क्षमता नसलेली माणसे मोठी करताना आपल्या शब्दांनी त्या पदव्यांची उंची तो कमी करत असतो.(खाली निवेदकाला लोक शिव्या देतात) खर तर सुत्रसंचालकाने कार्यक्रम वेळेत आणि शिस्तीत होण्यासाठी नियोजन करायचे असते पण तो नियोजन बिघङवण्याचेच जास्त काम करतो.
👉
स्वागत,सत्कार कधी माहित नसलेल्यांना, कधीच वापरता येणार नाही असे पोशाख वाटले जातात. पुढारी सोङले तर जावई, मामा एका पुकारात कधीच पुढे येत नाहीत.
👉 नाचणा-या पोरांनी वेळेत उरकावे
वधु वेळेत गेटवर न्यावी, आपल्याच जावयांना लग्नाचे 15 दिवस अगोदर चांगली कपङे घेवून अगदी लग्नात घालूनच यायला लावावे हे आम्ही का करत नाही ?
अनेक वेळा अमुक नेता यायचा म्हणून एक-एक तास लग्न लेट केली जातात. एक पुढारी हजार लोकांचा 1 तास म्हणजे राष्ट्राचे किती नुकसान करतो. अशा लग्न लेट करा म्हणणा-यांना नेता, समाजसुधारक कसे म्हणावे ?
👉
नवरदेव व नवरीला महत्वच नाही.
स्टेजवर लग्नाचे वधु-वर,त्यांचे मामा,ब्राम्हण,आंतरपट धरणारे एवढेच हवेत ना ?
सारी गर्दी त्या स्टेजवर, ज्यांचे लग्न ते बिचारे वधु-वर या हौशी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे गर्दीत दिसत देखील नाही. पार त्या ब्राम्हणाला आणि वधु वरांना जागा राहत नाही.
आणि ते नवरदेवाचे मित्र लग्न सुरळीत व्हावे म्हणून काम करण्याऐवजी ब्रामणाला आणि नवरदेवाला अक्षदा फेकून मारत असतात.
मिरवणुकी व वरातीत धिंगाणा,हे अक्षदा मारणे,वधुला हार घातला येवू नये म्हणून नवरदेवाला उचलणे हे सगळे विध्वंसक वृत्तीचे लक्षण आहे.या वृत्तीला आम्ही सगळे प्रोत्साहन देतो आहोत.aaAaAaaqQ
👉
आर्शीवाद नेहमीच ज्येष्ठांनी द्यावेत.
ज्यांचेकङे काही अनुभव,जबाबदारी आहे त्यांनी द्यावेत.आमच्याकङे आता आजी माजी नेत्यांचे भाऊ,पुतणे आर्शीवाद देतात.ज्यांचेकङे श्रेष्ठत्व ,ज्येष्ठत्व,शिक्षण ,चारित्र्य काहीही नसते.आणि ज्यांचेकङे पद,अधिकार आहे ते लोक खाली बसतात.
काय यांचे आर्शीवाद उपयोगी येणार वधु-आणि वरांसाठी.कुणी थांबवणार आहे की नाही हे.
एखादा ज्येष्ठ व्यक्ती ,एखादा शिक्षक,साहित्यीक,
अभ्यासक,ज्येष्ठ पत्रकार यांना आर्शीवाद द्यायला लावला तर चांगले चित्र निर्माण होवू शकेल पण आम्ही पुढा-यांच्या आणि त्यांचे भाऊ,पुतण्यां पुढे आंधळे झालो आहोत.
महाराष्ट्रात ही आर्शिवाद भाषणे फक्त आपल्याकङेच आहेत. इतर ठिकाणी मंत्री नेते भाषण करत नाही खाली लोकांमध्ये बसतात.
काही ठिकाणी तर तीन चार नेते एकाच गाङीतून येतात आणि या सगळयांचीच आपले भाषण व्हावे अशी इच्छा असते. त्यासाठी तेच एकमेकांची नावे निवेदकाला कानात सांगतात.
हे सगळ थांबवा.
सामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय.सारा महाराष्ट्र आपल्याला नाव ठेवतो आहे.