हिंदू विवाह कायदा

हिंदू विवाह कायदा विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून... या कायद्याची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली संसदेत केली होती. पण सर्व सनातनी हिंदूंच्या विरोधामुळे हा कायदा रखडला म्हणूनच बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा) च्या अंतर्गत १९५५ साली हिंदू विवाह कायदा स्थापित झाला. याच कालावधीत महत्वाच्या ३ इतर कायद्यांचीही निर्मिती झाली. ते ३ कायदे म्हणजे - हिंदू वारसाहक्क कायदा (१९५६) , हिंदू अल्पसंख्यांक आणि पालकत्व कायदा (१९५६), हिंदू दत्तकविधान आणि निर्वाह कायदा (१९५६). सद्य हिंदू कायदा पद्धतीचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कायदे मांडले गेले. उद्देश हिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा) च्या अंतर्गत हिंदू विवाह कायदा संसदेमध्ये १९५५ मध्ये आणला गेला. याचा उद्देश हिंदू लोकांचे वयक्तिक आयुष्य, विशेषतः समाजातील लग्न व्यवस्था, त्याची कायदेशीर वैधता, अवैधातेच्या अटी आणि व्यवहार्यता यांना नियमाच्या चौकटीत बसवणे आणि कायद्...