तुळशीचे लग्न..
हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरासमोर किंवा घरामागे तुळस असतेच.
कार्तिक शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे.
श्री विष्णूचा/ बाळकृष्णाचा तुळशीबरोबर विवाह लावला जातो. या तिथिनंतर खऱ्या अर्थाने लग्नाचे मुहूर्त चालू होतात. तुळशीचे लग्न झाले म्हणजे आता घरातील लग्न समारंभ करायला आपण मोकळे असा प्रघात आहे.
आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नयेय साठी धार्मिक संस्कारांचा भर दिलेला आहे.
तेव्हा आता आपल्याकडेही विवाहयोग्य वधू / वर असतीलच, त्यांचेसाठी आपण या ब्लॉगच्या मदतीने योग्य जोडीदार शोधू शकता. आपल्या समाजाचा हा ब्लॉग आपल्या मदतीसाठीच आहे तेव्हा आजच आपल्या मूला/मुलीचे नांव ब्लॉगवर नोंदवा...