Time to Celebrate.....
नमस्कार...
'पाथरवट मॅट्रिमोनी' हा ब्लॉग सुरू करून एक वर्ष होऊन गेले आहे.. या एका वर्षात जवळपास दीडशे मुलामुलींची नावे ब्लॉगवर नोंदवण्यात आली.. पैकी बऱ्याच मुलामुलींचे विवाह झाले आहेत.. होत आहेत..
समाजातील मुलामुलींचे लग्न जमविण्यासाठी पालकांची होणारी दमछाक ही काही कोणाला नवी नाही.. म्हणून समाजासाठी उपयोगी पडेल असे काहीतरी करण्याचा विचार होता.. त्यातूनच ब्लॉगची संकल्पना पुढे आली.. आणि.. लगेच अंमलात आणली.. समाज बांधवांनी तात्काळ भरपूर प्रतिसाद दिला.. आणि आज यशस्विततेचे एक वर्ष पार करीत आहे..
आपल्या मुलामुलींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठीच हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे.. पालकांची होणारी दमछाक व परस्परात येणारी कटुता टाळण्यासाठी या ब्लॉगचा चांगला उपयोग आहे.. मुलामुलींची संपूर्ण माहिती या ब्लॉगवर मिळाल्यामुळे इच्छुकांना आपल्या आवडीनुसार निवड करायला सुसंधी मिळते..
बऱ्याच जणांनी मुलामुलींचे फोटो टाकण्याबद्दल सुचविले होते.. पण.. फोटोचा कोणी गैरवापर करू शकतात.. तसेच फोटो एडिटिंग असू शकतात.. आणि फोटो पेक्षा प्रत्यक्ष पाहून मुलामुलींची निवड सार्थ होऊ शकते.. आशा विचाराने फोटो टाकले नाहीत.. ज्यांना पाहिजे ते समोरील व्यक्तींना संपर्क करून मागू शकता..
सध्या तरी..
नावनोंदणी करणे हे माझ्या हातीच आहे.. त्यामुळे ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांना मला संपर्क करावा लागेल किंवा वधू/वरांची माहिती मला पाठवावी लागेल.. पण.. लवकरच पाथरवट मॅट्रिमोनी चा मोबाईल ऍप करण्याचा मानस आहे.. लवकरच तो ही सत्यात उतरेल.. म्हणजे आपल्याला डायरेक्ट नोंदणी करता येईल.. असा प्रयत्न आहे..
तरी इच्छुक वधू-वरांची नावे ब्लॉगवर नोंदवून योग्य जोडीदार शोधण्यासाठी ब्लॉगचे सहकार्य घ्यावे..
आपला हा ब्लॉग म्हणजे लग्न जुळवणारी संस्था नसून फक्त माहिती एकमेकांना मिळावी व पालकांना सुकर व्हावे हा उद्देश आहे..
एक "मोबाईल वधूवर मेळावा" समजा ना..
असो..!
सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसेच सहकार्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार...
आपला स्नेहांकीत..
👍
संजय धानके (विमा प्रतिनिधी)
अध्यक्ष, पाथरवट समाज, कोपरगांव