मनोगत

💞
नमस्कार..
नुकताच पाथरवट समाजाचा वधू वर परिचय मेळावा १०/०२/१९ रोजी शिर्डी येथे धुमधडाक्यात संपन्न झाला.. सर्व समाजाने भरभरून प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या स्थरातून मेळावा खूप छान झाल्याच्या प्रतिक्रिया पण आल्या.. पण मला मुख्य प्रश्न होता याचं फलित..? जरा जरा चौकशीत होतोच.. आज आठ दिवसांत असे कळतेय की बऱ्याच ठिकाणी बोलणी सुरू आहे, बैठका चालू आहे.. लवकरच लग्न जमल्याच्या बातम्या पण येतील.. हेच मेळाव्याचे यश असे मी समजेन आणि आम्हा सर्व टीमच्या श्रेयाचे फलीत..
सर्व नोंदणी केलेल्या मुलामुलींचे बायोडाटा patharvatmatrimony.blogspot.com या ब्लॉगवर टाकलाच आहे..
*पण...
पण, आपल्याला इथेच थांबायचे नाहीये..
आपल्यापैकी बऱ्याच समाजबांधावांचे नातेवाईक सारखेच आहेत.. प्रत्येक लग्नाला त्यांना उपस्थित राहावे लागते.. प्रत्येकाला प्रत्येक लग्नाला वेगवेगळा खर्च करून जावे लागते.. म्हणून पुढील टप्प्यात
"सामुदायिक विवाह सोहळा" आयोजित करण्याचा मानस आहे.. यासाठी आपली मानसिकता आणि सहकार्य हवे.. वधू-वारांकडील मंडळींनी जर ठरवले तर हे सहज शक्य आहे.. पै-पाहुण्यांना पण सोयीस्कर होईल आणि मुला-मुलीच्या घरचा खर्च पण वाचेल.. वाचलेला पैसा नावदाम्पत्यास कामी येऊ शकतो..
तेव्हा नक्की विचार करा.. तुमची तयारी असेल तर आम्हाला कळवा.. आपण सर्वजण मिळून एक चांगला सामाजिक उपक्रम राबवू या.. "सामुदायिक विवाह सोहळा" साजरा करू या..
माझा नंबर तुमच्याकडे आहेच..
9823222670 (संजय धानके)

Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन