पाथरवट सारा एक...



दि. १४/२/२०२०, सटाणा येथे
चि. निखिल चंद्रकांत टोरपे (नाशिक) आणि
चि.सौ.का. पूनम रामदास चव्हाण (दरेगाव, सटाणा)
यांच्या विवाहास उपस्थित होतो. पाथरवट वधुवर मेळावा आणि पाथरवट मॅट्रिमोनि चे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल, की दोन भिन्न विभागातील पाथरवट समाज आज या विवाहाने जोडला गेला आहे. म्हणजे आता महाराष्ट्रातील सर्व भागातील समाज खऱ्या अर्थाने आता जोडला गेला आहे. मेळाव्यास दोन्ही परिवार उपस्थित होते, त्यांनी घेतलेला निर्णय हा नक्कीच ऐतिहासिक होणार आहे. या पूर्वी पण असे प्रयत्न झालेत पण यश आज आले त्या बद्दल दोन्ही परिवाराचे विशेष कौतुक आणि वधूवरांस वैवाहिक जीवनास शुभेच्छा..!
💐
संजय धानके (विमा प्रतिनिधी)
अध्यक्ष : पाथरवट समाज, कोपरगांव
संचालक : पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
पाथरवट सारा एक हा मंत्र घेऊन २००६ पासुन महाराष्ट्रातील च नाही तर देशभरातील हिंदु पाथरवट एका मंचावर यावेत यासाठी अ.भा.पाथरवट समाज महासंघाचे कार्य सुरु झाले, आज ह्या विवाहामुळे  महाराष्ट्रातील ज्ञात असलेले पाचही गट रोटी व्यवहारच नाही तर बेटी व्यवहाराने एकमेकांशी जोडले गेले. एकमेकांचे सगे सोयरे झाले.आणखी एक पाऊल पुढे पडले. ह्या पाथरवट समाज व एकीकरणात अनेकांचे योगदान आहे. अनेकांचे श्रम, वेळ, धन, बुध्दी, संघटन करण्यासाठी ची मनापासून ची तळमळ, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग ह्यामुळे हे शक्य झालेे. महाराष्ट्रातील पाथरवट समाजाच्या स्थानिक संस्था संघटना यांनाही ह्याचे श्रेय आहे. तसेच गेल्या वर्षी कोपरगांव पाथरवट समाज मंडळाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सर्व पाथरवट समाजाचे वधुवर त्यात भाग घेऊ शकतील असा शिर्डी येथे घेतलेला वधुवर परीचय मेळावा आयोजित करून सर्वांना सुखद सकारात्मक दृष्टिकोन दिला व विचार करायला भाग पाडले. आनंद वाटला.
वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी व समाजापुढे ह्या सर्व गोष्टींची मनोभूमिका मांडण्यासाठी अ.भा.पाथरवट समाज महासंघाचे वतीने मला व कोपरगाव पाथरवट समाजाच्या वतीने श्री. संजयजी धानके यांना वर व वधु पक्षाने संधी दिली त्या दोन्ही परीवारांचे आभार..
चला आपले सगे सोयरे आणखी वृध्दींगत करुया.
समाज संघटीत करण्यासाठी एकत्र येऊया.
🙏
@ उध्दवराव विश्राम काळे (नाशिक)
सरचिटणीस, अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघ.


Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन