गोष्ट लग्नाची : प्रश्न आयूष्याचा - मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?
मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?
मुलीचे वय मुलापेक्षा कमी असणे गरजेचे आहे व यास वैज्ञानिक कारण आहे. साधारण पाच वर्षाचे अंतर असावे. याची कारणमीमांसा वैवाहिक जीवनाच्या दोन भागात विभागली जाते. एक लक्षात घेणे आवश्यक आहे की विवाहा चा निर्णय शिल्लक संपुर्ण आयुष्याचा विचार करून घेतला जातो.
मुलाचे वय विवाहाच्या वेळेस सरासरी पंचवीस वर्षे असेल तर तो आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झालेला असतो व स्वतंत्र संसार करण्यास सक्षम असतो. त्याच वेळी त्याची भावी पत्नी वीसीत असेल तर तीचे पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण झालेले असते व संसार करण्याची मानसीक तयारी झालेली असते.या वयापर्यंत अल्लडपणा कमी झालेला असतो.
आता सर्वात महत्वाचा भाग जो शरीरविज्ञानाशी संबधीत आहे. साधारण पंचेचाळीशीच्या आसपास स्त्रीची रजोनिवृत्ती होते. या काळात स्त्रिया मानसिक दृष्ट्या खुप दोलायमान/ लहरी असतात. आपले कामजीवन संपुष्टात आल्याची तीव्र जाणिव मनामध्ये असते. या नाजूक काळात तीला समजून घेण्याची व आपली कामेच्छा तीच्यावर न लादण्याची आवश्यकता असते. हा समजुतदारपणा तोच पुरूष दाखवू शकतो जो तोपर्यंत कामविषयक तृप्त असतो. साधारण वयाच्या पन्नासी मध्ये पुरूष या मानसिकतेला आलेला असतो व आपल्या पत्नीला रजोनिवृत्ती च्या काळात भावनीक आधार देवू शकतो.
जर दोघेही पंचेचाळीशीच्या वयात एकाच वयाचे असतील तर तीची रजोनिवृत्तीची अवस्था असते पण तो मात्र कामविषयक कार्यशील असतो. आणि मग सुरू होतो विसंवाद !हे
टाळण्यासाठी पुरूष वयाने मोठा असणे गरजेचे आहे. कारण तारूण्यात सर्व काही चालून जाते पण उतरत आयुष्य पण महत्वाचे आहे !!!
(आरोग्यनिती fb)