विनंती
नमस्कार..
पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉगच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी, इच्छुक मुलामुलींची माहिती समाजबांधवांना होण्यासाठी हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. गेल्या ४ वर्षांपासून ही सेवा मोफत चालू आहे. या माध्यमातून बरेच विवाह जुळले आणि झाले देखील आहेत.. ही सेवा अशीच अविरत देण्याचा माझा मानस आहे. तेव्हा विवाहेच्छू मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी आपल्या आवडीनुसार योग्य स्थळ शोधण्यासाठी या ब्लॉगवर नांव नोंदणी करून लाभ घ्यावा..
एक विनंती आहे की, ज्यांचे विवाह जुळले/झाले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला त्यांचे नाव कमी करता येईल, आपल्यालाही त्याचा त्रास होणार नाही.. बऱ्याच वेळा ज्यांचे विवाह जमलेत/झालेत, पण त्यांचे नांव ब्लॉगमध्ये तसेच राहते, करण त्यांची लग्न जमल्याची/झाल्याची माहिती मला मिळत नाही.
*तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील (बऱ्याच स्थळांचे संपर्क फोन लागत नाहीत) तरी बदललेले नवीन नंबर मला कळवावे, तसेच स्थळाच्या माहितीत काही बदल, अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे आपल्या स्थळाचा विचार करणाऱ्याला सुलभ होईल.
धन्यवाद..!
आपला-
संजय धानके (विमा प्रतिनिधी)
पाथरवट मॅट्रिमोनि ब्लॉग निर्माता
अध्यक्ष- पाथरवट समाज, कोपरगाव
मोबा.- 9823222670