प्री वेडिंग फोटोग्राफी योग्य की अयोग्य?*

लेख : (संकलित) लग्नाआधीची (Pre Wedding) फोटोग्राफी योग्य की अयोग्य ? ससमाजात लग्नाआधीच्या (Pre Wedding ) फोटोशूटचा मोठा ट्रेंड चालू झाला आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून हा ट्रेंड समाजात झपाट्याने पसरत आहे. प्री वेडिंग फोटोशूट सुरू होण्यामागचे कारण खूपच रंजक आहे. उदाहरणार्थ घरातील सजावट सुंदर दिसावी म्हणून आपल्या घराच्या छोट्या हॉलमध्ये इतके दिवे लावले जातात की आपल्याला इतक्या दिव्याची आवश्यकता सुद्धा नसते. त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यानी श्रीमंत लोकांना काही नवीन कार्यक्रम सांगण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट सुरू केले. ज्याप्रमाणे आपल्या घराच्या छोट्याशा हॉलमध्ये एवढ्या दिव्यांची गरज नसते, त्याचप्रमाणे लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात अशा प्री विडिंग सारख्या कार्यक्रमांची खरंच गरज असते का? वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाआधी छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन सुंदर लोकेशनला फोटोशूट करून घेतात. अनेक फोटो असे काढले जातात की वधू आणि वर एकमेकांच्या मिठीत गुंडाळलेले असतात. कधी कधी नववधू किमान (छोट्या) पोशाखात असतात आणि लग्नाच्या दिवशी मोठा स्क्रीन लावून ही प्री विडिंग फोटोग्राफी...