प्री वेडिंग फोटोग्राफी योग्य की अयोग्य?*

लेख : (संकलित)

लग्नाआधीची (Pre Wedding) फोटोग्राफी योग्य की अयोग्य ?

ससमाजात लग्नाआधीच्या (Pre Wedding ) फोटोशूटचा मोठा ट्रेंड चालू झाला आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून हा ट्रेंड समाजात झपाट्याने पसरत आहे. प्री वेडिंग फोटोशूट सुरू होण्यामागचे कारण खूपच रंजक आहे.  उदाहरणार्थ घरातील सजावट सुंदर दिसावी म्हणून आपल्या घराच्या छोट्या हॉलमध्ये इतके दिवे लावले जातात की आपल्याला इतक्या दिव्याची आवश्यकता सुद्धा नसते. त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट वाल्यानी श्रीमंत लोकांना काही नवीन कार्यक्रम सांगण्यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट सुरू केले. ज्याप्रमाणे आपल्या घराच्या छोट्याशा हॉलमध्ये एवढ्या दिव्यांची गरज नसते, त्याचप्रमाणे लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात अशा प्री विडिंग सारख्या कार्यक्रमांची खरंच गरज असते का?
वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाआधी छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन सुंदर लोकेशनला फोटोशूट करून घेतात. अनेक फोटो असे काढले जातात की वधू आणि वर एकमेकांच्या मिठीत गुंडाळलेले असतात. कधी कधी नववधू किमान (छोट्या) पोशाखात असतात आणि लग्नाच्या दिवशी मोठा स्क्रीन लावून ही प्री विडिंग फोटोग्राफी दाखविल्या जाते. आपण कोणाच्याही लग्नाला साक्षीदार होण्यासाठी जातो आणि वधू-वरांना त्यांचा जीवनसाथी होण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जात असतो. कल्पना करा की तुम्ही कोणाच्यातरी लग्नाला गेलात आणि तिथे मोठ्या पडद्यावर वधू आणि वर आधीच एकमेकांच्या मिठीत गुंडाळलेले आहेत... मग हे दृश्य पाहून तुम्हाला कसे वाटेल?  कारण आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नापूर्वी असा मोकळेपणा मान्य नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे.
हे फोटोशूट करण्यासाठी १ ते ५ लाख रुपये पर्यंत याखर्च येतो.  या फोटोशूटला परवानगी देणारे म्हणतील की लग्न आमच्या मुलांचे आहे…पैसे आमचे आहेत…म्हणून आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी ५ लाख रुपये खर्च केले तर चुकीचे काय? पण या मुळे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही वाटते की आपलेही असे फोटोशूट करावे. कृपया त्यांनी हे फोटोशूट करू नये. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी ते करावे पण त्याचे जाहीर प्रदर्शन तरी करू नये. आणि करायचेच असेल तर सुस्थितीत असलेले, सुसंकृत, संस्कारक्षम फोटो प्रदर्शित करावे. त्यांचे लहानपणापासून ते लग्नपर्यंतचे फोटो दाखवावे.
मुलांच्या सुखासाठी माणूस सर्व काही करतो. मुलांच्या आनंदाच्या दृष्टीने बघितले तर त्यात गैर काहीच नाही. पण कोणतीही घटना योग्य की अयोग्य, त्याचे समाजावर काय परिणाम होतात हे ठरवले जाते. प्री-वेडिंग फोटोशूटमुळे अनेक विवाह तुटत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. काही ठिकाणी वधूने वराऐवजी फोटोग्राफरशी लग्न केले.!  मुलांच्या आनंदासाठी, ज्यांच्याकडे इतके पैसे नाहीत, ते कर्ज घेऊनही हे फोटोशूट करून घेत असतात. त्यामुळे लग्नाच्या खर्चाबाबत आधीच टेन्शनमध्ये जगणाऱ्या सर्वसामान्यांचा ताण वाढत आहे. संस्कृतमध्ये म्हटले आहे, चिंता समं नास्ति शरीर शोषणम्. म्हणजे चिंतेसारखे शरीराचे शोषण दुसरे कोणी करत नाही. तणाव माणसाला आतून पोकळ बनवतो. ज्या फोटोशूटमधून समाजातील बहुतांश लोक तणावात राहतील, ते फोटोशूट म्हणजे जीवघेणा आजार ठरला तर ?
लग्नात पूर्वीपासूनच इतके कार्यक्रम असतात की, ज्याच्या तयारीसाठी हळद कुंकू पासून ते पाहुण्यांच्या निरोपापर्यंत घरातील मंडळींना आजीची आठवण येते. लग्नाचे सामान गोळा करण्याचा आमचा ताण वाढवण्यासाठी आम्हाला आणखी एका कार्यक्रमाची गरज आहे का?
एखादी व्यक्ती फक्त दोन वाक्ये ऐकण्यासाठी लग्नात इतका खर्च करते. ती दोन वाक्ये म्हणजे : "व्वा...काय मस्त लग्न आहे...!" फक्त ही दोन वाक्ये ऐकण्यासाठी तर मुलांच्या लग्नाआधी अनेक वर्षे जमा केलेले पैसे एका झटक्यात खर्च झालेले असतात. एकीकडे समाजसुधारक लग्नाचा खर्च कसा कमी करता येईल याचा सखोल विचार करत आहेत. त्यासाठी लग्नात दिल्या जाणाऱ्या जेवणातिल खाद्यपदार्थांची संख्या कमी करत आहेत. लग्नात काटकसर करून समाजातील मध्यमवर्गीय आणि निम्न स्तरातील लोकांना लग्नाच्या अनावश्यक खर्चाच्या तणावातून मुक्तता मिळत असते. तर दुसरीकडे धनदांडगे लोक मुलांच्या लग्नात प्री वेडिंग फोटोशूट करून समाजातील बहुतांश लोकांचे टेन्शन वाढवत आहेत
या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पैसे कुठून येणार? हे फोटोशूट म्हणजे समाजासाठी घातक आजार.! समाजात हा आजार झपाट्याने पसरत आहे कारण प्रत्येक तरुणतरुणींना आपण हिरो-हिरोईनप्रमाणे मोठ्या पडद्यावर दिसावे असे वाटते आणि मुलांच्या आनंदासाठी पालक कर्ज काढूनही त्यांची इच्छा पूर्ण करत आहेत.
प्री-वेडिंग फोटोशूटचे समाजावर होणारे दुष्परिणाम पाहता आजकाल काही ठिकाणी त्यावर निर्बंध लादले जात आहेत.  उज्जैनमधील सिंधी समाजाने त्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याचे उल्लंघन केल्यास वधू-वर दोघांकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. अखिल भारतीय माहेश्वरी समाजानेही यावर बंदी घातली आहे. त्यासाठी ते समाजाला जागरूक करत आहेत. जे कुटुंब हे फोटोशूट करून घेणार, हे लोक लग्नाला फक्त येणार आणि जेवण न करून आपला निषेध व्यक्त करणार!
लग्नाआधीच्या फोटोशूट सारखा ट्रेंड आपण फॉलो करणे गरजेचे आहे का?
पटलं तर यावर नक्की विचार करा
✍️✍️



Popular posts from this blog

नुकतेच जमलेले शुभविवाह...

विवाह सोहळा की विवाह संस्कार ?

विनंती / सूचना / आवाहन