जोडीदार निवडतांना..

जोडीदार निवडतांना नीट विचार करा... साधारण वयाची पंचविशी आली की त्या मुलाला किंवा मुलीला पाहून ‘यंदा कर्तव्य आहे’ अशी शेरेबाजी सुरु होते. काही वर्षांपुर्वीपर्यंत ही वयोमर्यादा कमी असली तरी आता मात्र करिअर, सेटलमेंट अशी टार्गेट्स पुर्ण झाल्याशिवाय ती आणि तो दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढायला तयार नसतात. मात्र वयाचा ठराविक आकडा गाठल्यानंतर मात्र घरच्यांकडून ख-या अर्थाने लगीनघाई सुरु होते. अशावेळी काहीजण ‘ आमचं ठरलंय’ म्हणत कुटुंबियांसमोर प्रेमाची कबुली देत लव्ह मॅरेजच्या गटात सामील होतात, तर काहींना अद्यापही परफेक्ट जोडीदाराची प्रतिक्षा असल्याने अनेकजण कुटुंबियांसह विवाह संस्थेकडे धाव घेतात. अर्थात लव्ह मॅरेज अस वा अरेन्ज… दोन्ही प्रकारात जोडीदाराची निवड ही महत्वाचीच असते. प्रेमविवाहात आधी मैत्री, प्रेम, एकमेकांसह घालवलेला वेळ आणि त्यानंतर ख-या अर्थाने लग्नाचा प्रवास सुरु होतो. प्रेमविवाहाचा एक फायदा म्हणजे लग्नापुर्वी जोडीदारासोबत पुष्कळ वेळ घालवता येतो, एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी जाणता येतात. मात्र यामधील एक महत्वाचा मुद्दा असा की याप्रकारात जोडीदाराच्या निवड ही आपलीच असल्याने लग्नानं...