काही विवाह संस्थे वाले फोन करतात त्यापासुन सावध रहा

🙏काही विवाह संस्थे वाले फोन करतात त्यापासुन सावध रहा.🙏🏻 सध्या काही भागातील विवाह संस्थेवाले फोन करून स्थळ सुचवीत आहेत. त्यांचे फोन आले तर पुर्ण माहिती नाव व गाव जिल्हा विचारुन घ्या, तिकडील एकदोन कार्यकर्ते यांची नावे विचारा व त्यानंतर खात्री करुनच माहिती द्या. गरज पडली व शंका आली तर खलील नंबरवर अवश्य मेसेज टाका किंवा फोन करा. जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद , पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात हिंदु पाथरवट समाज आहे. काही विवाह संस्था आपल्या ब्लॉगवरून माहिती घेऊन संपर्क करतात व स्थळ सुचवितात मात्र स्थळाची पूर्ण माहिती देत नाहीत व माहिती देण्यासाठी नांव रजिस्टर करायला सांगतात व फी आकारतात. असे फोन अल्येल्यांनी मला या बाबत चौकशी केली आहे. सदर विवाह संस्था चालकांचा तो बिझनेस आहे. तरी असे फोन आल्यास पैशाचा व्यवहार करू नये तसेच परिचित व्यक्तींना मध्यस्थी करावे. परस्पर माहिती देऊ नये. मॅट्रिमोनि संस्थेची पुर्णपणे खात्री करा, गुगलवर सर्च करा, आसपास चौकशी करा, संस्थेची माहिती घ्या. श्री. उद्धव काळे साहेब किंवा मला चौकशी करावी. आ...