Posts

Showing posts from November, 2022

वरमाला घालायची खूप छान आणि सुंदर पद्धत..

Image
 वरमाला घालायची खूप छान आणि सुंदर पद्धत...  पण आजकाल मुलं-मुली वर-खाली होत राहतात आणि वरमालाच्या कार्यक्रमाची खिल्ली उडवतात... हे चुकीचं आहे... हा बदल आपण सर्वांनी मिळून घडवायचा आहे..  चला आता आपण सर्व जण मिळून हा बदल घडवून आणू, आणि आपल्या धर्माची प्रतिष्ठा राखू... 🚩🚩

तुळशी विवाह

Image
तुळशी विवाहानंतर आपल्याकडे लग्नसराई सुरू होते. जाणून घ्या तुळशी विवाहबद्दल माहिती.. तुळशी विवाह  हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे  तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीला...