Posts

Showing posts from November, 2018

विनम्र सूचना....

Image
नमस्कार.. *पाथरवट मॅट्रिमोनी* वर आपण विश्वास दाखवून आपल्याकडील वधू/वराची नोंद केली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! पाथरवट मॅट्रिमोनी हा ब्लॉग सुरू करून वर्ष होत आले आहे.. या ब्लॉगच्या माध्यमातून बरेच विवाह झाले आहेत. त्यांची नावे आपण ब्लॉग मधून काढून टाकतो. पण सर्वांचीच माहिती मला मिळत नाही तरी ज्यांचे विवाह जुळले आहे त्यांनी मला तसे कळवावे म्हणजे मला नाव कमी करता येईल, म्हणजे आपल्याला होणारा त्रास पण कमी होईल. तसेच जर आपले फोन नंबर बदलले असतील तर नवीन नंबर मला कळवावे, तसेच माहितीत काही बदल अपडेट करायचा असेल तर तिही कळवावी म्हणजे इतरांना संपर्कासाठी सोपे होईल. धन्यवाद..! आपला संजय धानके (कोपरगाव) मोबा.- 9823222670

तुळशीचे लग्न..

Image
      हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरासमोर किंवा घरामागे तुळस असतेच.      कार्तिक शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे.  श्री विष्णूचा/ बाळकृष्णाचा तुळशीबरोबर विवाह लावला जातो. या तिथिनंतर खऱ्या अर्थाने लग्नाचे मुहूर्त चालू होतात. तुळशीचे लग्न झाले म्हणजे आता घरातील लग्न समारंभ करायला आपण मोकळे असा प्रघात आहे.       आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. विवाह म्हणजे केवळ एक धार्मिक वा सामाजिक विधी नसून, स्त्री व पुरुष- दोघांना पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी, दोघे एकरूप होऊन निसर्गचक्र चालू राहण्यासाठी हा विधी केला जातो. उत्तम संतान प्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने हेमंत ऋतूची योजना केलेली असावी. उत्तम संतानप्राप्ती यावरून स्त्री-पुरुषांचे लक्ष उडून जाऊ नये व केवळ शरीरसुख, कामनातृप्ती एवढ्यावरच समाधान मानून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू नयेय साठी ध...

दीपावलीच्या शुभेच्छा..!

Image