सावधान...😎

सोमवार दि. 25/2/2019 नमस्कार मॅट्रिमोनी ब्लॉगवर नाव नोंदवलेल्या स्थळांना कालपासून विशिष्ट फोन नंबर वरून फोन येत आहेत व नागपूर येथील विवाह संस्था असल्याचे व नाव नोंदणी करण्यासा सांगत आहे. तरी सर्व समाज बांधवांना सूचित करण्यात येते की आपली सेवा मोफत व समाजासाठी उपयुक्त आहे. सादर संस्था व्यावसायिक असू शकते किंवा फेक ही असू शकते तेव्हा असे फोन आल्यास आपली माहिती देऊ नये. आपली साईट ओपन असून कुणालाही पाहता येते, त्याचा वापर करून संपर्क करीत असतील तर त्यांना नकार देने सोयीस्कर ठरेल. आपल्या संपर्कातील, नात्यातील किंवा ब्लॉग मधील नोंदणी असल्याचे व्यतिरिक्त कुणाचा फोन आल्यास माहिती देऊ नये. ज्याप्रमाणे मोबाईल कंपन्या किंवा इतर कंपन्यांचे फोन येतात तसा हा समजावा व दुर्लक्ष करावे. आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. (संजय धानके)