Posts

Showing posts from June, 2021

अभिनंदन

Image
  पाथरवट मॅट्रिमोनी ब्लॉग मधून विवाह जुळण्याची प्रक्रिया चालूच आहे... लॉकडाउन मूळे विवाह समारंभ आणि इतर संबंधित कार्यक्रम थोडेसे शिथिल झाले होते, पण आता जसजशी सूट मिळत आहे तसे विवाह जुळणे आणि लग्नसमारंभ सुरू होत आहेत. लॉकडाउन मुळे उपस्थिती कमी ठेवावी लागते आहे. त्यामुळे बहुतेक वेळा घरचेच संख्येने पूर्ण होत आहेत.. असाच एक विवाह नुकताच जमला आहे आणि लवकरच ते मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत आहेत.. उभयतांना त्यांच्या भावी जीवनांस हार्दिक शुभेच्छा... वर क्र. 129 चि. रोहित प्रमोद धानके आणि वधू क्र. 75 कु. एकता संजय काळण

गोष्ट लग्नाची : प्रश्न आयूष्याचा - मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?

Image
  मुलाचे वय मुलीपेक्षा जास्त का असावे ?               मुलीचे वय मुलापेक्षा कमी असणे गरजेचे आहे व यास वैज्ञानिक कारण आहे. साधारण पाच वर्षाचे अंतर असावे. याची कारणमीमांसा वैवाहिक जीवनाच्या दोन भागात विभागली जाते. एक लक्षात घेणे आवश्यक आहे की विवाहा चा निर्णय शिल्लक संपुर्ण आयुष्याचा विचार करून घेतला जातो.              मुलाचे वय विवाहाच्या वेळेस सरासरी पंचवीस वर्षे असेल तर तो आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झालेला असतो व स्वतंत्र संसार करण्यास सक्षम असतो. त्याच वेळी त्याची भावी पत्नी वीसीत असेल तर तीचे पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण झालेले असते व संसार करण्याची मानसीक तयारी झालेली असते.या वयापर्यंत अल्लडपणा कमी झालेला असतो.              आता सर्वात महत्वाचा भाग जो शरीरविज्ञानाशी संबधीत आहे. साधारण पंचेचाळीशीच्या आसपास स्त्रीची रजोनिवृत्ती होते. या काळात स्त्रिया मानसिक दृष्ट्या खुप दोलायमान/ लहरी असतात. आपले कामजीवन संपुष्टात आल्याची तीव्र जाणिव मनामध्ये असते. या नाजूक काळात तीला समजून घेण्याच...

जागतिक पर्यावरण दिन त्या निमित्त

Image
आज ५ जून - जागतिक पर्यावरण दिन भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याचा आदर केला गेला आहे. पर्वत, नद्या, झाडे, सूर्य-चंद्र आणि पंचतत्त्वे या सर्वांची पूजा केली गेली आहे. पंचतत्त्वातील पाचही तत्त्वे एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहेत. त्यातील एक प्रदूषित झाल्यास त्याचा परिणाम इतर चारांवरही होतो. त्यामुळे मानवाने आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत सर्व उत्सव साजरे करायला हवेत. खरेतर जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीमध्ये अशाच प्रकारे निसर्गाबद्दल आदरभाव दिसून येतो. आज मानवी मनाला तणावमुक्त करून, दूर सारून हा श्रद्धाभाव परत आणण्याची तसेच पर्यावरण रक्षणात समाजाचा सहभाग मिळवण्याची आणि पर्यावरणाबद्दल त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. पर्यावरण आणि विवाह सोहळे विवाह सोहळा… म्हणजे पारंपरिक विधी, थाटमाट… अंगतपंगत… रुखवत… मंगल अक्षता… या सगळ्यांची रेलचेल… आजच्या महागाईच्या काळातही अशा पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर विधी आनंदाने पार पडतात… वधु-वरांसह पै पाहुणे सगळेच जण यामध्ये आनंदाने सहभागी होतात, मात्र सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या युगात या ...