कपड्यांचा आहेर - एक मुर्खपणा साधारण एका गरीब घरचं लग्न म्हटलं तरी किमान आहेरात मोडल्या जाणाऱ्या साड्या ह्या दीडशेच्या आसपास लागतातच. ही आहेरात दिली जाणारी साडी शे-दीडशे दोनशे रुपयाच्या आसपास असते. त्याची गुणवत्ता महत्वाची नसते फक्त एक परंपरा म्हणून समाजाच्या बोकांडी बसवुन ती साडी वाटली जाते किंवा वाटायला भाग पाडली जाते. बरं ही आहेराची साडी एखाद्या स्रीला चुकुन जर लग्नाच्या मंडपात देण्यात आली नाही तर त्या संबंधित वरमायला ती ही तशीच तिच्या कार्यात जशास तसा म्हणून तिला टोमणा मारुन धडा देते. हे मानपान सन्मान इतके पागंतात की वधु वराला कोणी खाक मानत नाही. हा लग्न नावाचा धडाकेबाज event नेमका कोणासाठी असतो हा मात्रा संशोधनाचा विषय आहे. बरं मानापानावरून लटकणारे ह्यांचे चमकीदार नाक.. आहेराची साडी मिळाली म्हणून काय घरी वापरणार ? नाही ती as it is दुसऱ्या पाहुण्यांच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात आहेर म्हणुनच forward केली जाईल किंवा त्या साडीला भांड्यावाल्याला देऊन प्लास्टीकचे डबे, मग्गे, बकेटी घेणे किंवा पापड, कुर्डया, शेवया, वाळत घालण्यासा...